वाराणसी: विकास परियोजनांना ठप्प करण्याचा आरोप लागल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, त्यांनी विरोधी पक्षाप्रमाणे बंद साखर कारखान्यांना जमीन विकली नाही आणि कोणत्याही जातीय भेदभावाशिवाय चार लाख नोकर्या दिल्या.
अनेक विकास परियोजना सुरु केल्यानंतर मउ कलेक्ट्रेट मध्ये आपल्या वक्तव्यात योगी यांनी समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी अलीकडेच सरकारवर आजमगढ मध्ये विकास परियोजनांना रोखण्याचा आरोप लावला होता.
मुख्यमंत्री योगी यांनी सांगितले की, पूर्वाचल एक्सप्रेसवे पूर्व यूपी चा कणा बनेल आणि क्षेत्रातील युवांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करेल. ऊस शेतकर्यांना लवकरात लवकर थकबाकी त्यांच्या बँक खात्यात जमा होईल आणि बंद साखर कारखान्यांना पुन्हा चालू करणे आणि युवांना रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांनी सांगितले की, काही साखर कारखान्यांवर खटले सुरु आहेत आणि ते लवकरात लवकर मिटावेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ज्यानंतर त्यांना पुन्हा सुरु केले जाईल.