भोपाळ : भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन बनविण्यामध्ये मध्य प्रदेश सरकार महत्त्वाची भूमिका निभावण्यासाठी तयार आहे. राज्याचे अर्थमंत्री जगदीश देवडा यांनी सांगितले की, राज्य सरकारकडून अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी इथेनॉल उत्पादनासारख्या इथेनॉल उत्पादनासारख्या नव्या क्षेत्रांमधील शक्यता तपासण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
देवडा म्हणाले, मध्य प्रदेशातील रोजगार वाढीसाठी औद्योगिक गुंतवणुकीला अधिकाधिक प्रोत्साहन दिले जात आहे. देवडा यांनी आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील बजेटबाबत उद्योग समुहांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. ते म्हणाले, उद्योग समुहांच्या अपेक्षांचा विचार करताना त्यांच्या मागण्यांचा समावेश धोरण आणि निर्णय प्रक्रियेत केला जाईल.
देवडा यांनी सांगितले की, सर्व जिल्ह्यांना इंडस्ट्रिअल फ्रेंडली बनविण्यासाठी योजना तयार करण्यात आली आहे. स्थानिक उत्पादनांच्या मूल्यवर्धनासाठी स्थानिक स्तरावर काम केले गेले पाहिजे, असे प्रयत्न आहेत. राज्य सरकारकडून इथेनॉल उत्पादनासारख्या नव्या क्षेत्रांचा शोध घेतला जात आहे.