पानीपत : साखर कारखाना प्रशासनाने उसावरील रोगापासून होत असलेल्या नुकसानीला रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ऊस संशोधन केंद्र कर्नालच्या संशोधकांनी कारखाना प्रशासनाला प्रशिक्षण दिले आहे. पुढील हंगामात ऊसाच्या खराब प्रजातीच्या खरेदीवर निर्बंध लागू केले जाऊ शकतात. गेल्या वर्षी उसावर लाल सड आणि टॉप बोरर या किडींचा प्रादुर्भाव झाला होता. त्यातून कारखाना प्रशासन आणि शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. तरीही सरकारच्या निर्देशानंतर कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांकडून सर्व प्रकारचा ऊस खरेदी केला.
जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आधी ऊसापासून प्रती क्विंटल १० किलो साखर उत्पादन केले जात होते. मात्र, किड, रोगांमुळे रसाचे प्रमाण घटले आहे. उसाचे वजन खालावले आहे. त्यामुळे साखर उतारा ८ ते ८.५० किलो एवढाच आहे. १७ मार्च ते ३१ मे या कालावधीत ४३ लाख क्विंटल उसाचे गाळप झाले. प्रती क्विंटल कमी रस निघाल्याने कारखाना प्रशासनाचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात २८,००० एकर जमिनीवर उसाचे उत्पादन घेतले जाते. ४५०० हून अधिक शेतकऱ्यांनी ६० लाखांचा करार कारखान्याशी केला आहे. कारखान्याची गाळप क्षमता एक कोटी क्विंटलची आहे. प्रती दिन ५० हजार क्विंटल ऊस गाळप केला जाऊ शकतो. गेल्या हंगामात ऊसावरील रोगांमुळे कारखान्याचे मोठे नुकसान झाल्याचे एमडी नवदीप सिंह यांनी सांगितले. आता आगामी हंगामासाठीची तयारी सुरू केली आहे, असे ते म्हणाले.