बेतिया : कोरोनापासून बचावासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. त्यासाठी सरकार आणि उद्योग क्षेत्रासह खासगी क्षेत्रातील संघटनाही प्रयत्नशील आहेत. त्याच अनुषंगाने तिरुपती साखर कारखाना बगहाच्या व्यवस्थापनाने शेतकऱ्यांना कोविड १९ची लस देण्यासाटी प्रयत्न सुरू केले आहेत. मंगळवारी जिल्हाधिकारी कुंदन कुमार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत याची माहिती देण्यात आली.
बैठकीत ऊस आयुक्तांनी सांगितले की, मधुबनी, भितहा, ठकराहां, पिपरासी यांसह दियारा परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कोविड १९ची लस घेण्यासाठी जागृत करण्यात येत आहे. साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. त्यासाठी साखर कारखाना प्रशासन नेहमी जिल्हा प्रशासनासोबत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व साखर कारखाना प्रशासनास लसीकरण अभियानाशी शेतकऱ्यांना जोडण्याचे आवाहन केले. जिल्हा प्रशासन व्हॅक्सिन ऑन डिमांड अभियान राबवत आहे. एकाच ठिकाणी ५० पेक्षा अधिक लोक जर लस घेणार असतील तर त्यांच्यासाठी वैद्यकीय पथक जाग्यावर पोहोचून कोविडचे लसीकरण करेल. यासाठी मोबाइल तसेच व्हॉट्सअॅपवरही मेसेज पाठविण्याची सोय करण्यात आली आहे.
यावेळी सिव्हील सर्जन डॉ. अरुणकुमार सिन्हा, जिल्हा पदाधिकारी डॉ. अवधेश कुमार सिंह यांसह तिरुपती साखर कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link