नवी दिल्ली/ तेहरान : ईराणमधील चाबहार बंदरावर व्यापार वाढविण्यासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट आणि दीनदयाल पोर्ट बंदर, शिपिंग आणि जलमार्गास सवलत देण्यात आली आहे. ऊर्जा संपन्न ईराणच्या दक्षिणी तटावर सिस्तान-बलुचीस्तान प्रांतातील हे बंदर भारत, ईराण आणि अफगाणिस्तानने विकसित केले आहे. चाबहार बंदर पर्शियन खाडीबाहेर असल्याने भारत पाकिस्तानला टाळून पश्चिम टोकाला सहजपणे पोहोचू शकतो.
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, चाबहारमधील शाहिद बेहेश्टी बंदराचा विकास करण्यासाठी ईराणने जवाहरलाल नेहरू पोर्ट आणि दीनदयाल बंदरावरील वाहतूक आणि मालवाहतुकीला संबंधित शुल्कात सूट देत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून मालवाहतुकीच्या कंटेनरसाठी टर्मिनल हँडलिंग शुल्कात पन्नास टक्क्यांची सवलत देण्यात आली आहे. बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या माहितीनुसार, या बंदरावर कार्गोतून मालवाहतुकीचा प्रवाह वाढला आहे. अफगाणिस्तानहून ट्रान्झिस्ट कार्गो येत असून शिपिंगचे प्रमाणही वाढले आहे. चाबहार बंदरातील वाहतूक सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.