लखनौ : कसावापासून (Cassava) इथेनॉल उत्पादनासाठी National Sugar Institute (NSI), Kanpur आणि ICAR-Central Tuber Crop Research Institute (ICAR-CTCRI) संयुक्तरित्या काम करणार आहेत. दोन्ही संस्थांच्या संचालकांनी आणि तज्ज्ञांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या विषयावर चर्चा केली. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऊस तसेच धान्य वगळता इतर फीड स्टॉक विकसित करण्यावर भर दिला जात आहे. याबाबत NSI चे संचालक नरेंद्र मोहन यांनी सांगितले की, साखर उद्योगाच्या आपल्या काही मर्यादा आहेत. आणि इथेनॉलसाठी साखरेचे डायव्हर्शन नेहमी साखरेच्या किमतीवर अवलंबून असते. जर साखरेचे दर वाढले तर साखर कारखाने इथेनॉल उत्पादनाकडे दुर्लक्ष करतील. अशा स्थितीत इथेनॉल पुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम होतील.
ICAR-Central Tuber Crop Research Institute चे संचालक डॉ. एम. एन. शीला यांनी सांगितले की, सद्यस्थितीत कसावाची मुख्य रुपात केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तर पूर्व राज्यांत लागवड केली जाते. त्याचा वापर मुख्यत्वे जेवणाच्या रुपात आणि स्टार्च तसेच साबुदाणा उत्पादन करण्यासाठी केला जातो. यामध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असते. आणि इथेनॉल उत्पादन करण्यासाठी हा एक संभाव्य स्रोत होवू शकतो. त्यांनी सांगितले की भारतात कसावाचे प्रती हेक्टर उत्पादन सर्वाधिक आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या मानवाच्या वापरासाठी उपयुक्त नाहीत. मात्र त्यामध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असल्याने त्याचा वापर इथेनॉल निर्मिती करण्यासाठी केला जाऊ शकतो. नरेंद्र मोहन यांनी सांगितले की दोन्ही संस्था संयुक्त रुपात, कसावा स्टार्च, कसावा आटा आणि कसावा कंदापासून इथेनॉल निर्मिती किती होईल हे तपासण्यासाठी नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट, कानपूरमध्ये पायलट प्रोजेक्ट राबवतील.