मंड्या (कर्नाटक) : कर्नाटकमध्ये अनेक साखर कारखान्यांचे पुनरुज्जीवन केले जात आहे. याशिवाय बंद असलेले साखर कारखाने पुन्हा सुरू करावेत अशी मागणीही होऊ लागली आहे.
स्टारऑफम्हैसूर या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत खासदार सुमलता अंबरीश यांनी सांगितले की, मायशुगर साखर कारखान्याचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मांड्या जिल्ह्यात पांडवपुरा आणि मायशुगर हे दोन साखर कारखाने आहेत. जेव्हापासून मी खासदार म्हणून पदभार स्वीकारला आहे, तेव्हापासून कारखाने पु्न्हा सुरू करणे हे माझ्यासमोरील आव्हान आहे. मी माझ्या निवडणुकीच्या प्रचारातही शेतकऱ्यांना याचे आश्वासन दिले आहे. आम्ही पांडवपुरा साखर कारखाना सुरू करण्यात यशस्वी ठरलो. आता हा दुसरा कारखाना सुरू केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. कारखाना सुरू करण्याबाबात सातत्याने मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांशी संपर्क साधला आहे. काहीजण यात आडकाठी आणायचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, मला कोणत्या पद्धतीने मार्ग काढायचा हे ठाऊक आहे असे खासदार अंबरीश म्हणाल्या.