“साखर कारखाना सुरू करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न”

फरीदकोट : कीर्ती युनियनच्या प्रदेश विभागाचे अध्यक्ष राजिंदर सिंह दीप सिंह वाला यांच्या अध्यक्षतेखाली युनियनच्या नेत्यांनी आमदार गुरदित सिंह सेखो यांची भेट घेतली. फरीदकोट येथील बंद साखर कारखाना पुन्हा सुरू करावा या मागणीचे निवेदन आमदारांना देण्यात आले. पंजाबमध्ये आता आपचे सरकार आहे. त्यामुळे साखर कारखाना लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, अशी मागणी कीर्ती शेतकरी युनियनच्या फरीदकोट जिल्हा समितीच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

फरीदकोटमधील सहकारी साखर कारखाना अकाली दल-भाजप सरकारने बंद केला होता. या कारखान्याच्या मशीनरीला काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात भाड्याने देण्यात आले होते. कारखआना वाचविण्यासाठी आमदार सेखो यांनी दीर्घ काळ संघर्ष केला आहे. त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यावेळी तत्कालीन काँग्रेस सरकारच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. गुरदित सिंह सेखो हे शेतकऱ्यांचे हीत जपतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. कारखाना लवकर सुरू करण्यासाठी पावले उचलण्याची मागणी करण्यात आली.

आमदार सेखो यांनी फरीदकोट साखर कारखाना सुरू करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू असे सेखो म्हणाले. यावेळी राजिंदर सिंह किगरा, शमशेर सिंह किगरा, सुरेंदरपाल ढिल्लों, हरमन रोरी कपूरा, हरी सिंह कोठे महाला सिंह, जगजीत सिंह जेटली, गुरमीत सिंह, गुरमेल सिंह, सुखमंदिर सिंह सारवा आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here