इजिप्तने आंतरराष्ट्रीय निविदेतून केली 1 लाख टन कच्च्या साखरेची खरेदी

कैरो : इजिप्तमधील राज्य साखर खरेदीदार संस्था ESIICने एका आंतरराष्ट्रीय निविदेच्या माध्यमातून जवळपास 1,00,000 टन कच्ची साखर खरेदी केली आहे.

याबाबत प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, युरोपातील व्यापाऱ्यांनी सांगितले की, 1,00,000 टन कच्च्या साखरेची खरेदी दोन टप्प्यात करण्यात आली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात समान 50,000 टन साखर खरेदी केली. या साखरेचा दर 470 $ प्रती टन आहे. व्यापाऱ्यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात 1-15 एप्रिल या दरम्यान इजिप्तसाठी ट्रेडिंग हाऊस
Dreyfus कडून खरेदी करण्यात आली होती. व्यापाऱ्यांनी सांगितले की, दुसऱ्या टप्प्यात 16-30 एप्रिल या काळासाठी Viterra या व्यापार समुहाकडून याची खरेदी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here