कैरो/ काहिरा : इजिप्तने युक्रेनकडून साधारणत १,७५,००० टन गव्हाची खरेदी केली आहे. रशियासोबत युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच युक्रेनकडून गव्हाची खरेदी करण्यात आली आहे. इजिप्तच्या पुरवठा आणि अंतर्गत व्यापार मंत्रालयाने अल-मॉनिटरला सांगितले की, २०२३ च्या मध्यापर्यंत जवळपास १ लाख टन गव्हाची आयात करण्याचे मंत्रालयाचे उद्दिष्ट आहे. त्यातून गव्हाचा धोरणात्मक साठा वाढविण्याचे नियोजन केले जाईल. आणि स्थानिक बेकरी तसेच खासगी क्षेत्राच्या गरजा पूर्ण केल्या जाऊ शकतात.
अंतर्गत व्यापार आणि पुरवठा उप मंत्री इब्राहिम अश्मावी यांनी २८ नोव्हेंबर रोजी स्थानिक टीईएन टीव्ही चॅनेलला सांगितले की, इजिप्तचा धोरणात्मक गव्हाचा साठा पुढील पाच महिन्यांसाठी पुरेसा आहे. इजिप्त जगातील द्वितीय क्रमांकाचा गव्हाचा आयातदार आहे. देशांतर्गत गव्हाचा वार्षिक खप जवळपास २५ मिलियन टन आहे. तर देशात जवळपास १२ मिलियन टनाचे उत्पादन केले जाते. उर्वरीत गव्हाची आयात केली जाते.
इजिप्शियन फोरम फॉर इकॉनॉमिक अँड स्ट्रॅटेजिक स्टडिजचे प्रमुख रशद अब्दो यांनी अल-मॉनिटरला सांगितले की, युक्रेनी गहूच्या खरेदीसाठी इजिप्तकडून करण्यात आलेला करार हे एक चांगले पाऊल आहे.