कैरो : इजिप्त भारत आणि चीनकडून गहू आयात करताना भारतीय रुपया आणि चीनी युआनमध्ये सौदा करण्यावर विचार करीत आहे, असे पुरवठा आणि अंतर्गत व्यापार मंत्री अली मोसेल्ही यांचा हवाला देऊन अश्रक बिझनेसने म्हटले. मंत्रालयाच्या मुख्यालयात आयोजित परिषदेत मोसेल्ही यांनी सांगितले की, उत्तर आफ्रिकी देश सद्यस्थितीत या प्रकरणी चीन आणि भारतासोबत वाणिज्य आणि केंद्रीय बँकांसोबत चर्चा करीत आहे. मात्र, ते आतापर्यंत कोणत्याही अधिकृत करारापर्यंत पोहोचलेले नाहीत.
मंत्री मोसेल्ही यांनी सांगितले की, सध्याच्या पिक हंगामाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत शेतकऱ्यांकडून ३,६५,००० टन गव्हाची खरेदी केली गेली आहे. मोसेल्ही यांनी असेही सांगितले की, यावर्षी जवळपास ५ मिलियन टन गव्हाची आयात करणे हे इजिप्तचे उद्दिष्ट आहे. १२ एप्रिल रोजी इजिप्तच्या कॅबिनेटने हंगाम २०२३ साठी शेतकऱ्यांकडून गव्हाच्या खरेदीसाठी अतिरिक्त प्रोत्साहन मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे गव्हाची किंमत २३.५ कॅरेट प्रती आर्डेब १,५०० ईजीपी झाली आहे.