काहिरा : इजिप्तकडे, देशात सध्या उपलब्ध असलेला साखरेचा साठा आगामी ७.७ महिन्यांसाठी पुरेसा आहे, असे इजिप्तचे पुरवठा मंत्री एली मोसेल्ही यांनी सांगितले. तर वनस्पती तेलाचा देशात ६.१ महिन्यासाठी पुरेसा साठा आहे असे मोसेल्ही म्हणाले. सरकार निर्यातदार देशांकडून पिकाची खरेदी करण्यासह देशांतर्गत उत्पादन वाढवून इजिप्तचा गोदाम साठा वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे, असे त्यांनी सांगितले.
इजिप्तने २०११ मध्ये २.६ मिलियनटन स्थानिक उत्पादीत केलेल्या गव्हाची खरेदी केली होती. एक वर्षापूर्वी हा गहू २.१ मिलियन टन होता. इजिप्त जगातील गव्हाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. आपल्या गरजेच्या निम्म्या गव्हाची आयात इजिप्तकडून केली जाते. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात सरकारने सांगितले होते की, त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या गव्हासाठी LE ३८० ($ ६३.६०) प्रती ardeb (१४० किलो) दिले होते. शेतकऱ्यांना प्रोत्साहन रुपात देण्याच्या LE ३५० पेक्षा ही अधिक किंमत आहे.