कैरो : चीनी मंडी
इजिप्तच्या इजिप्शियन शुगर अँड इंटिग्रेडेट कंपनीने ब्राझीलची एक लाख टन कच्ची साखर खरेदी केली आहे. इजिप्तने या महिन्यात साखरेचा पुरेसासाठा असल्याचे जाहीर केले होती. पुढच्या साडे सात महिन्यांसाठीचा साखरेचा साठा उपलब्ध असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतरही ब्राझीलची एक लाख टन साखर इजिप्तने खरेदी केली आहे.
सुकडेन या व्यापारी कंपनीने सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात ५० हजार टन ब्राझीलच्या कच्च्या साखरेची बोली लावली होती. तर, ऑक्टोबरच्या ५० हजार टन साखर देण्यात येणार होती. इजिप्तच्या इजिप्शियन शुगर अँड इंटिग्रेडेट कंपनीने हा दोन्ही कोटा उचलला आहे, अशी माहिती ब्राझीलच्या अन्न पुरवठा खात्याकडून देण्यात आली आहे.