कैरो : इजिप्तने साखर आयातीवरील निर्बंध आणखी तीन महिन्यांसाठी वाढवले आहेत. सोमवारी अधिकृतरित्या प्रसिद्ध झालेल्या राजपत्रात व्यापार आणि उद्योग मंत्री निवेने गामीया यांनी याची माहिती दिली आहे.
देशांतर्गत साखर उद्योगाला पाठबळ देण्यासाठी साखर आयात तीन महिने रोखण्यात आल्याचे मंत्री गामिया यांनी सांगितले. त्यानुसार, पुढील तीन महिने पांढरी आणि कच्ची साखर आयातीस अनुमती मिळणार नाही. जोपर्यंत व्यापार आणि उद्योग तसेच पुरवठा आणि देशांतर्गत व्यापार मंत्र्यांकडून पूर्व अनुमती मिळत नाही, तोपर्यंत हे निर्बंध लागू राहतील असे सांगण्यात आले.
देशात स्थानिक उद्योगांच्या संरक्षणाच्या उद्देशाने साखरेच्या आयातीवर अस्थायी निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र, व्यापार तसेच पुरवठा मंत्र्यांच्या अनुमतीने साखर आयात केली जाऊ शकते असे सूत्रांनी सांगितले.