कैरो : इजिप्तने साखर उत्पादनात आघाडी घेतली असून आगामी तीन वर्षांतच देश साखर उत्पादनात आत्मनिर्भर होईल असा विश्वास डेल्टा शुगर कंपनीचे अध्यक्ष अहमद अबू अल-यजीद यांनी व्यक्त केला.
एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अध्यक्ष अहमद अबू अल-यजीद यांनी इजिप्तमध्ये सद्यस्थितीत २.७ मिलियन टन साखरेचे उत्पादन होत आहे. त्यातून देशातील गरजेच्या ९० टक्के साखर उत्पादित होत असल्याचे स्पष्ट केले. डेल्टा शुगरने कृषी उत्पादने आणि खतांच्या उत्पादन क्षेत्रात प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.
जानेवारी महिन्यात पुरवठा आणि अंतर्गत व्यापार मंत्री अली अल-मोशेली यांनी साखर उत्पादक कंपन्यांच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी २०२१ च्या गळीत हंगामातील ऊसाचे क्षेत्र, ऊस लागवड आणि त्यातून होणारे अपेक्षित साखर उत्पादन याचा आढावा घेतला होता. सरकारने या राष्ट्रीय उद्योगाला येणाऱ्या अडचणी दूर करून त्याला संरक्षण देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले होते. उद्योग आणि व्यापार मंत्री नेवाईन गामिया यांनी सप्टेंबर २०२० मध्ये तीन महिन्यांसाठी पांढऱ्या साखरेची आयात करण्यास मनाई आदेश जारी केला होता.