इजिप्तचे पुरवठा आणि अंतर्गत व्यापार मंत्री अली मोसेली यांनी बुधवारी २,००,००० टन कच्च्या साखरेच्या आयातीची घोषणा केली. ही शिपमेंट लवकरच येण्याची अपेक्षा आहे असे त्यांनी सांगितले.
मंत्री मोसेली यांनी सांगितले की, देशातील धोरणात्मक साठा वाढविण्याच्या दृष्टीने आणि किमान सहा महिन्यांचा साठा पुरेसा राहिल याची दक्षता घेण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
इजिप्तकडील अधिकृत चलनवाढीच्या आकडेवारीनुसार, गेल्यावर्षीच्या या महिन्याच्या तुलनेत जुलै २०२३ मध्ये साखरेच्या किमती ३८.४ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
मात्र, सरकारने या महिन्याच्या सुरुवातीला जेथे शिधापत्रिकाधारकांसाठी अनुदानित किमतीत वस्तू विकल्या जातात, अशा पुरवठा दुकानांमध्ये साखरेचा तुटवडा असल्याचे नाकारले होते.