इजिप्त वाढवणार साखरेचे उत्पादन

 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

कैरो इजिप्त) चीनी मंडी

साखरेच्या बड्या बाजारपेठांपैकी एक असलेल्या इजिप्तमध्ये आता साखर उत्पादन वाढवण्याचे धोरण आखण्यात आले आहे. इजिप्तच्या शारकिया या साखर कारखान्याने दोन लाख टन वार्षिक उत्पादन क्षमतेने काम करण्यास सुरुवात केली आहे. तसेच या सारखा आणखी एक साखर कारखाना सुरू होणार असल्याची माहिती सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.

इजिप्तला दर वर्षी ३२ ते ३३ लाख टन साखरेची गरज असते. तुलनेत देशात बीट आणि उसापासून २२ लाख टन साखरेचे उत्पादन होते, अशी माहिती इजिप्तच्या पुरवठा मंत्रालयाने दिली. साखरेची गरज आणि उत्पादन यांतील तफावत दूर करण्यासाठी इजिप्तचे अध्यक्ष अबदेल फत्ताह अल-सिसी यांनी देशातील साखर कारखान्यांचा विकास करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात अन्न व पुरवठा मंत्री अली मोसेलहि म्हणाले, ‘साखरेची सर्वाधिक मागणी असलेल्या देशांमध्ये आमचा समावेश आहे. त्यामुळेच आम्ही साखर उत्पादन वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करत आहोत. शारकिया साखर कारखान्याची क्षमता वर्षाला २ लाख टन साखर उत्पादनाची आहे. असाच आणखी एक साखर कारखाना सुरू होणार आहे.’

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here