EID Parry इथेनॉल उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी २८६ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

नवी दिल्ली : देशातील प्रमुख साखर निर्माता ईआयडी पेरी (इंडिया) ने आपली इथेनॉल उत्पादन क्षमता विस्तार करण्यासाठी २६८ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची योजना तयार केली आहे. आपल्या भविष्यातील विकासाच्या रणनीतीच्या रुपात कंपनी हरित ऊर्जा क्षेत्रात वाढत्या क्षमतेचा लाभ मिळविण्यासाठी आपल्या युनिट्मध्ये इथेनॉल आणि एक्स्ट्रा न्युट्रल अल्कोहल (ईएनए) उत्पादन क्षमतांचा विस्तार करीत आहे.

द हिंदू बिझनेस लाइनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एस. सुरेश यांच्या म्हणण्यानुसार, धान्यावर आधारित आसवनी योजना प्रगतीपथावर आहे. एप्रिल २०२३ पर्यंत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. ते म्हणाले की, आंध्र प्रदेशातील संकिली युनिटमध्ये १२० KLPD (किलो लिटर प्रती दिन) मल्टी-फीड डिस्टिलरी युनिट योजना पूर्ण झाली आहे. आणि जानेवारी २०२३ मध्ये सिरपवर आधारित डिस्टिलरीचे उत्पादन सुरू होईल.

एस. सुरेश म्हणाले की, अलिकडेच डिस्टिलरी क्षमता ५० केएलपीडीवरून वाढवून १२० केएलपीडी करण्यात येत आहे. याशिवायस संचालक मंडळाने अलिकडेच नेल्लीकुप्पम सुविधेच्या ७५ केएलपीडीपासून १२० केएलपीडीपर्यंतच्या विस्तारास मंजुरी दिली आहे. एकदा हा विस्तार पूर्ण झाल्यानंतर आमची एकूण आसवनी क्षमता ५८२ KLPD होईल. या दोन्ही विस्तारासाठी २६८ कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीचा समावेश असेल. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये हा खर्च केला जाईल.
अलिकडील वर्षात देशामध्ये पेट्रोलसोबत इथेनॉल मिश्रण हळूहळू वाढत आहे आणि जून २०२२ मध्ये भारताने निर्धारीत वेळेपूर्वी पाच महिने आधी, १० टक्के इथेनॉल मिश्रण पुरवठ्याचे उद्दिष्ट गाठले आहे. देशात २०२५-२६ पर्यंत मिश्रण दुप्पट करण्याचे, २० टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी अनुमानीत २.६८ बिलियन गॅलन अथवा १०.१५ बिलियन लिटर इथेनॉलची गरज भासेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here