आंबेडकरनगर, उत्तर प्रदेश: जिल्ह्यातील सुमारे ६ हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अकबरपूर साखर कारखान्याने ८ कोटी रुपयांची ऊस बिले जमा केली आहेत. आता फक्त दोन दिवसांची सुमारे दीड हजार शेतकऱ्यांचे पावणेदोन कोटी रुपयांची बिले थकीत राहीली आहेत. लवकरच हे पैसेही शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून ऊस बिलांच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मिझौडाच्या अकबरपूर साखर कारखान्याने दिलासा दिला आहे. गेल्या वर्षी २४ नोव्हेंबर रोजी अकबरपूर कारखान्याचे गाळप सुरू झाले होते. सुरुवातीला कारखान्याने १०५ लाख क्विंटल ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवले होते. मात्र, नंतर त्यात कपात करून ते ८५ लाख क्विंटलवर आणण्यात आले. कारखान्याचा गाळप हंगाम २३ मार्च रोजी समाप्त झाला. तेव्हा उद्दीष्टाच्या तुलनेत ८४ लाख ८२ हजार क्विंटलचे गाळप करण्यात आले. ऊस कारखान्याला दिल्यापासून पंधरा दिवसांत बिले देण्याचा नियम असला तरी शेतकऱ्यांना पैसे मिळविण्यासाठी खूप प्रतीक्षा करावी लागली. अनेकवेळा शेतकऱ्यांनी बिलांसाठी कारखान्याच्या फेऱ्या मारल्या.
कारखान्याने हळूहळू शेतकऱ्यांना बिले देण्यास सुरुवात केली. १८ मार्चअखेर ऊस पाठवलेल्या शेतकऱ्यांना पैसे देण्यात आले. १९ मार्च ते २३ मार्चपर्यंत सुमारे ७ हजार शेतकऱ्यांना पावणेदहा कोटी रुपयांची बिले थकीत राहीली होती. आता १९ ते २१ मार्च या कालावधीतील ६ हजार शेतकऱ्यांना आठ कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. उप महाव्यवस्थापक अरविंद सिंह यांनी संगितले की, २१ मार्चपर्यंतची बिले दिली आहेत. उर्वरीत २ दिवस म्हणजे २२ आणि २३ मार्च रोजी ऊस पाठवलेल्या दीड हजार शेतकऱ्यांची थकबाकी आहे. ती लवकरच दिली जाईल.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link