अदीस अबाबा : इथियोपिया सरकारने आठ साखर कारखान्यांच्या लिलावासाठीच्या निविदा प्रक्रियेत भाग घेण्यासाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (ईओआय) जमा करण्यासाठी गुंतवणूकदारांकडून प्रस्ताव मागविले आहेत. देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणेचा भाग म्हणून, इथियोपिया सरकारने अर्थव्यवस्थेतील खासगी क्षेत्रासाठी एक महत्त्वाची भूमिका घेण्याबरोबरच राष्ट्रीय संसाधनाच्या कुशल वापरासाठी आपली कटिबद्धता असल्याचे स्पष्ट केले आहे. सरकारने साखर कारखान्यांची मालकी आणि नियंत्रणात खासगी क्षेत्राच्या भागिदारी वाढविण्याच्या उद्देशाने समग्र साखर क्षेत्रात सुधारणा सुरू केल्या आहेत.
इथियोपिया सरकार आता आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत दोन्ही गुंतवणुकींसाठी ८ कारखान्यांच्या निविदा प्रक्रियेत भाग घेण्यासाठी आमंत्रण दिले आहे. लिलावामध्ये ओमो कुराज १, ओमो कुराज २, ओमो कुराज ३, ओमो कुराज ५, अर्जो डेडेसा, केसेम, टाना बेल्स आणि तेंदाहो (शुगर एन्टरप्राइजेससोबत) साखर कारखाने सहभागी आहेत. प्रस्तावित देवाण-घेवाणीच्या उद्देशाने देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी प्रतीस्पर्धात्मकतेमध्ये सुधारणा आणि साखर उत्पादनात वाढ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इथियोपीयामधील साखरेची आयात करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या परकीय चलनाचा खर्च वाचविण्याचा उद्देश यामागे आहे. या क्षेत्रातील चांगल्या कामगिरीमुळे उत्पन्नात वाढ होईल आणि लोकांच्या जीवनाचा स्तर सुधारेल. अनेक लोक ऊसाच्या मळ्यावरच अवलंबून आहेत. देशांतर्गत साखरेची मागणी पूर्ण करण्यासह प्रक्रिया केलेली साखर तसेच कच्च्या साखरेच्या निर्यातीची संधीही उपलब्ध होऊ शकते. सद्यस्थितीत इथियोपियामधील ऊस शेतीची स्थिती पाहता देशातील परकीय चलनाचा प्रवाह यातून सक्षम करणे शक्य आहे.