‘क्रांती’ कारखान्याची निवडणूक बिनविरोध

सांगली : जिल्ह्यातील कुंडल (ता. पलूस) येथील क्रांतीअग्रणी डॉ. जी.डी. (बापू) लाड सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. या कारखान्यासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ९ जुन होती. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी २१ अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. २६ जून रोजी याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडून औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे. निवडणूक अधिकारी म्हणून डॉ. एस.एन. जाधव यांनी काम पहिले.

सांगली जिल्ह्यातील एक आदर्श कारखाना म्हणून क्रांती कारखान्याची ओळख आहे. उसाची देणी आणि कर्मचार्यांचे पगार वेळेत देण्याची कारखान्याची ख्याती आहे. शेतकरी विकास आणि ऊस उत्पादन वाढीसाठी कारखाना प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरु असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here