माणगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध

सांगली : २०१७ पासून बंद अवस्थेत असलेल्या आटपाडी तालुक्यातील माणगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध पार पडली. ११५०५ सभासद असलेल्या या कारखान्याच्या १७ जागांसाठी १० जूनला मतदान होणार होते. आटपाडीसह मान आणि सांगोला असे तीन तालुक्याचे या कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी ३१ मे २०२३ ला राजेंद्रआण्णा देशमुख गटाच्या इच्छुक उमेदवारांनी माघार घेतल्याने कारखान्याची सत्ता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तानाजी पाटील यांच्याकडे गेली. नव्याने सत्तेवर आलेल्या संचालक मंडळाला थकीत ऊस बिलाबरोबरच कामगारांची देणी भागवावी लागणार आहेत. कारखाना गेली काही वर्धे बंद असल्याने मशिनरी गंजली आहे. कारखान्याची डागडुजी आणि दुरुस्ती करण्यासाठी कोटयवधी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here