सोळंके कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरु

माजलगाव : बीड जिल्ह्यातील तेलगाव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. २२ मे २०२३ पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. मतदान २५ जून रोजी होणार आहे.

या कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २६ मे आहे. २९ मे रोजी छाननी तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २९ मे ते १३ जूनपर्यंत आहे. चिन्ह वाटप आणि अंतिम यादी १४ जून रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. २५ जून रोजी मतदान आणि २६ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here