एलन मस्क पुन्हा बनले जगातील सर्वाधिक श्रीमंत

अब्जाधिश एलन मस्क पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आबेत. ब्लुमबर्गच्या बिलियनेअर इंडेक्सनुसार, १८७ अब्ज डॉलर संपत्तीसह मस्क पुन्हा एकदा अब्जाधिशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आले आहेत. त्यांनी गेल्या वर्षी यादीत पहिला क्रमांक पटकावलेल्या फ्रेंच लग्जरी ब्रँड लुइस वित्तोंचे सीईओ बर्नार्ड अरनॉल्ट यांना मागे टाकले आहे.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, एलन मस्क यांची संपत्ती १८७.१ अब्ज डॉलर आहे. तर बर्नार्ड अर्नाल्ट यांची संपत्ती १८५.३ अब्ज डॉलर नोंदविण्यात आली आहे. गेल्या वर्षी यादीत दुसऱ्या क्रमांकावर घसरलेल्या मस्क यांच्या संपत्तीत २०२३ मध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. याचे कारण आहे, त्यांची ऑटो कंपनी टेस्लाच्या शेअर्समध्ये झालेली प्रचंड वाढ. या वर्षी टेस्लाच्या शेअर्समध्ये ९० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे २०२३ मध्ये मस्क यांची संपत्ती ३६ टक्के म्हणजे ५० अब्ज डॉलरने वाढली. डिसेंबरच्या अखेरपर्यंत मस्क यांची संपत्ती १३७ अब्ज डॉलर होती. या दरम्यान, ते २०० अब्ज डॉलर संपत्ती गमावणारे पहिले व्यक्ती बनले होते. ऑक्टोबर महिन्यात ४४ अब्ज डॉलर खर्चुन ट्विटरचे अधिग्रहण केल्यानंतर कंपनीच्या महसुलात मोठी घसरण झाली होती. त्यासाठी कंपनीने जाहिरादरातांवर दबाव टाकणाऱ्या कार्यकर्त्यांच्या समुहांना जबाबदार धरले होते. त्यानंतर मस्क यांनी कंपनीतील निम्या कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here