केन्या: ऊसाच्या कमीमुळे 500 कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार

नैरोबी: युगांडातून ऊसाच्या आयातीवरील प्रतिबंधानंतर केनियाच्या बुसिया साखर उद्योग व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांची कपात करणे सुरु केले आहे, याबाबत 500 कर्मचाऱ्यांना नोटीस दिली गेली आहे. कारखाना व्यवस्थापनानुसार पुरेशा ऊस पुरवठ्या अभावी कारखान्याच्या गाळपावर परिणाम झाला आहे. देशात ऊसाच्या कमी नंतर साखर कारखान्याने युगांडातील त्या शेतकऱ्यांनी ऊसाचा आधार घेतला होता, ज्यांच्या जवळ अतिरिकत ऊस होता. पण आता आयातीवर प्रतिबंध असल्याने ऊसाची कमी जाणवत आहे, आणि पूर्ण क्षमतेने गाळप करण्यात कारखाने असमर्थ आहेत. ज्यामुळे जवळपास 500 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढावे लागत आहे.

व्यवस्थापनाकडून देण्यात आलेल्या नोटीस मध्ये सांगण्यात आले आहे की, कच्च्या मालाच्या कमीमुळे बुसिया साखर उद्योग लिमिटेड च्या व्यवस्थापनाने आपल्या काही कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडेच कारखान्याचे प्रमुख निदेशक अली तैयब यांनी प्रश्न उपस्थित केला की, सरकारने युगांडातून कच्च्या मालावर प्रतिबंध घालण्याचा पर्याय का निवडला. तैयब यांनी ऊसाच्या आयातीवर प्रतिबंध घालण्याच्या निर्णयाला रद्द करण्यासाठी कृषी सचिव पीटर मुन्या यांच्याकडे अर्ज केला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here