ट्रकमध्ये जादा साखर भरणारे आजरा कारखान्याचे कर्मचारी निलंबित

कोल्हापूर : आजरा साखर कारखान्यामध्ये विक्रीसाठी पाठविण्याच्या ट्रकमध्ये १० मेट्रिक टनाऐवजी १२ मेट्रिक टन साखर भरली गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ट्रकमध्ये २ टन जादा साखर भरल्याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. कारखान्याचे अध्यक्ष वसंतराव धुरे यांनी ही माहिती दिली. २७ रोजी हा प्रकार घडला. याबाबत २८ तारखेला कायदेशिर सल्लागारांचे मत घेवून संबंधीत क्लार्क व गोडावून किपर या दोघांना कारखान्याने कारणे दाखवा नोटीस दिली आहे. त्यांना चौकशी होईपर्यंत निलंबित केले असल्याचे त्यांनी सांगितले.

२७ रोजी कारखान्याने १० मे.टन साखरेची विक्री केली. संबंधित खरेदीदार पार्टीने साखर भरण्यासाठी ट्रक गोडावूनमध्ये पाठवला. यावेळी १० मेट्रिक टन साखर भरणे अपेक्षीत होते. तसे इन्व्हॉईस हिशोब विभागाने दिले होते. मात्र, ट्रकमध्ये १२ मे.टन साखर भरली गेली. ट्रक गेटमधून बाहेर पडल्यानंतर संबंधीत क्लार्कच्या ही चूक लक्षात आली. त्यांनी वाहन चालकास फोन करून ट्रक परत कारखान्यावर बोलवला. जादा भरलेली साखर उतरवून घेतली. या प्रकाराची माहिती प्र. कार्यकारी संचालकांना देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here