पाटणा : राज्य सरकार बिहारला देशातील आघाडीच्या राज्यांमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे राज्यात इथेनॉल उत्पादनाला अधिक प्रोत्साहन दिले जात असल्याचे प्रतिपादन बिहारचे उद्योग मंत्री शाहनवाज हुसेन यांनी केले.
इथेनॉल आधारित कुकिंग स्टोव्हच्या प्रात्यक्षिक कार्यक्रमानंतर मंत्री हुसेन म्हणाले, इथेनॉल धोरण लागू झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये इथेनॉलवर आधारित युनिट स्थापन करण्यासाठी प्रस्ताव दाखल झाले आहेत. यापैकी अनेक प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. इतर प्रस्तावांवर विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्योग मंत्री हुसेन म्हणाले, राज्य सरकारच्या इथेनॉल उत्पादनाच्या धोरणाकडे पाहता अनेक कंपन्या आणि गुंतवणूकदार इथेनॉल इंधनावर आधारित उत्पादनांची निर्मिती करू इच्छित आहेत. या क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या विविध प्रयोगांची माहिती देताना हुसेन यांनी या सर्व प्रयत्नांची दिशा योग्य असल्याचे सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link