मेरठ : मवाना साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२१-२२ची बुधवारी अखेरचा ऊस गाळप करून समाप्ती करण्यात आली. अखेरच्या दिवशी जवळपास ४५ हजार क्विंटल ऊसाचे गाळप करण्यात आले. साखर कारखाना प्रशासनाने ऊस कमी येऊ लागल्यानंतर तीनपैकी दोन युनिट आधीच बंद केले होते. फक्त एका युनिटवर सध्या गाळप सुरू होते. कारखाना प्रशासनाने १७ मे रोजी गळीत हंगाम समाप्त केला जाणार असल्याची नोटीस १६ मे रोजी प्रसिद्ध केली होती.
दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, अखेरच्या दिवशी ऊस जास्त येण्याची शक्यता गृहित धरून एक दिवस उशीरा हंगाम समाप्त केली. बुधवारी ४१ हजार क्विंटल ऊस मिळाला. सर्व ऊस गाळप केल्यानंतर गाळप हंगामाची समाप्ती करण्यात आली. कारखान्याचे वरिष्ठ ऊस महाव्यवस्थापत तथा प्रशासन अधिकारी प्रमोद बालियान यांनी सांगितले की, या गळीत हंगामात कारखान्याने शेतकऱ्यांना २० मार्चपर्यंतची ऊस बिले दिली आहेत. एकूण ६.८८ कोटी रुपयांपैकी ४९० कोटी रुपयांची बिले देण्यात आली आहेत. उर्वरीत १९८ कोटी रुपयेही लवकरात लवकर शेतकऱ्यांना दिले जातील असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.