सांगली : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम सर्वांच्या सहकार्यामुळे यशस्वीपणे पार पडला आहे. चालू गळीत हंगामात १४८ दिवस उसाचे गाळप झाले. त्यामध्ये साडेदहा लाख टनापेक्षा अधिक ऊस गाळप झाले आहे. ११ लाख ८२ हजार साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. कारखान्याने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत काम केले आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार मोहनराव कदम यांनी केले. कारखान्याच्या गळीत हंगाम सांगता समारंभावेळी ते बोलत होते.
कारखान्याने १० लाख ५९ हजार ७८० टन उसाचे गाळप केले आहे, तर ११ लाख ८२ हजार ३०९ क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. सभासद, शेतकरी, तोडणी व – वाहतूक कंत्राटदार, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने हंगाम यशस्वी झाल्याचे अध्यक्ष कदम म्हणाले. यावेळी तोडणी वाहतूक कंत्राटदार, बैलगाडी कंत्राटदार, हार्वेस्टिंग मशीन मालकांचा सत्कार करण्यात आला. संचालक रघुनाथराव कदम, उपाध्यक्ष पुरुषोत्तम भोसले, संचालक पंढरीनाथ घाडगे, बापूसाहेब पाटील, युवराज कदम, दिलीपराव सूर्यवंशी, सयाजी धनवडे, डी. के. कदम, जगन्नाथ माळी, शिवाजी गढळे, संभाजीराव जगताप, शिवाजी काळेबाग, कार्यकारी संचालक शरद कदम उपस्थित होते.