शामली साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची समाप्ती

मेरठ : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम समाप्त झाला आहे. जिल्ह्यातील तिसरा कारखाना, शामली साखर कारखान्याने १.०७ कोटी क्विंटल उसाचे गाळप करून सकाळी बंद करण्यात आला. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा शामली कारखान्याला ६.५० लाख क्विंटल ऊस कमी मिळाला आहे.

याबाबत दैनिक अमर उजालामधील वृत्तानुसार, आठ नोव्हेंबर २०२१ रोजी शामली कारखाना सुरू झाला होता. या वर्षी नव्या गळीत हंगामात कारखान्याने मंगळवारी सकाळी सहा वाजता १.०७ कोटी क्विंटल उसाचे गाळप करुन हंगाम समाप्तीची घोषणा केली. पाच महिने ४० दिवस कारखान्याचा गळीत हंगाम सुरू राहिला. गेल्या वर्षी २०२०-२१ मध्ये शामली कारखान्याने १.१३ कोटी क्विंटल उसाचे गाळप केले होते. या वर्षी २०२१-२२ मध्ये १.०७ कोटी क्विंटल उसाचे गाळप करण्यात आले आहे. या वर्षी कारखान्याला ६.५० लाख क्विंटल ऊस कमी मिळाला आहे. जिल्ह्यातील बजाज समुहाचा थानाभवन साखर कारखाना २७ एप्रिल आणि ऊन साखर कारखाना सात मे रोजी बंद झाला आहे. शामली कारखान्याचा गळीत हंगाम बंद झाल्याने आता रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी झाल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here