कोल्हापूर: केडीएएम असोसिएट्स आणि चिनीमंडी डॉट कॉम आयोजित “साखर क्रांती 2020” परिसंवादाला आज उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र साखर आयुक्तालय सह संचालक श्री. संजय भोसले होते. व मंचावरती केडीएएम चे मान्यवर श्री एम ए. महेंद्र भोंबे, श्री. आशिष देशमुख, चिनीमंडी डॉट कॉम चे संस्थापक श्री.उप्पल शाह होते.
“शेतकरी टिकला तर साखर कारखाने टिकतील” असे मत महाराष्ट्र साखर आयुक्तालय सह संचालक संजय भोसले (उप-पदार्थ) यांनी व्यक्त केले. तसेच त्यांनी उप-पदार्थ व त्यासंबंधित विषयांबद्दल वास्तववादी मार्गदर्शन केले. या सदरच्या चर्चासत्राचे आयोजन सयाजी हॉटेल, बसंत हॉल, जुना पुणे बंगलोर हायवे, कोल्हापूर येथे केले होते.
या चर्चा सत्राची सुरवात झाली प्रस्तावनेने CMA स्वप्निल मैड यांनी केली इथेनॉल – साखर कारखाण्यासाठी संजीवनी या विषयाने झाली यानंतर प्रश्न उत्तरे व याला आसवानी तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. यांनतर जी. एस. टी. नियम ४२/४३ साखर कारखान्यांसाठी नवीन आव्हान या विषयवरती श्री एम ए. महेंद्र भोंबे यांनी केले, GST कायद्याच्या नियम ४२ / ४३ चे योग्य आकलन झाल्यास साखर कारखान्यांच्या कार्यकारी भांडवलात मोठ्या प्रमाणात बचत होईल असे मत त्यांनी मांडले. दुपारच्या सत्रात “खेळते भांडवल व्यवस्थापन/ शासकीय योजना साखर उद्योगांसाठी या वर मा. आशिष देशमुख यांचे सादरीकरण केले. यानंतर शेवटच्या सत्रात जी. एस. टी. ऑडिट व साखर कारखान्यातील आधुनिकरण या वरती तज्ज्ञांची चर्चा झाली.
या एक दिवसीय चर्चासत्रासाठी विविध साखर कारखान्यांचे एम. डी. श्री. सचिन जाधव, श्री.भास्कर घुले, श्री. दत्त शिरोळ स. सा. का चे माजी एम. डी. श्री. डी. एस. गुरव,शिवाजी विद्यापीठाचे डॉ. विजय काकडे ,अभिजित भोरकर, प्रकाश लागमवार, उदय पाटील, राहुल मेंच, श्री एम ए. महेंद्र भोंबे, आशिष देशमुख, धनंजय कुमार वात्सायन, अभिजीत पाटील व साखर कारख्यांनातील अकाउंटंट, डिस्टिलरी मॅनेजर आदी लोक उपस्तिथ होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.