नजीबाबाद : बिजनौर जिल्ह्यातील नजीबाबाद येथील युवा संशोधक रॉबिन कुमार यांनी साखर कारखान्यांमध्ये निर्माण होणाऱ्या काळ्या राखेचा वापर इंधनाच्या स्वरुपात करण्यासाठी एक प्रोजेक्ट तयार केला आहे. जाब्तागंज येथील पोलिस विभागातील सेवानिवृत्त ओमप्रकाश यांचे सुपुत्र रॉबिन कुमार यांनी नोएडातील डॅन्सो इंडिया लॅबमध्ये काळ्या राखेचे इंधनात रूपांतर करुन वैकल्पिक ऊर्जा स्त्रोत विकसित करण्याचा प्रोजेक्ट तयार केला आहे. कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या काळ्या राखेमुळे पर्यावरणाची हानी होते. मानवासाठी ती धोकादायक असते. कारखान्यांबाहेर ढिगारे साठणाऱ्या काळ्या राखेचे रॉबिन यांनी डॅन्सो इंडिया लॅबमध्ये परीक्षण केले. स्टार्च आणि केमिकलच्या मदतीने राखेतील ठोस पदार्थ बदलले.
दैनिक जागरणमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, आचार्य आर. एन. केला इंटर कॉलेजमधून पदवी आणि बिजनौरच्या कृ्ष्णा कॉलेजमधून मायक्रोबायोलॉजीचे शिक्षण घेतलेल्या रॉबिनने दावा केला आहे की, या पर्यायामुळे कचऱ्यापासून सुटका होईल. बाजारात ऊर्जेचा नवा स्त्रोत दिसेल. या राखेपासून तयार झालेला पदार्थ जाळला तर त्याचा ७० टक्के उपयोग होईल. तीस टक्के राख शिल्लक राहिल. त्याचे ऊर्जेमध्ये रुपांतर करण्याचे काम सुरू आहे. या फॉर्म्युल्याचे पेटंट करणार असल्याचे आणि आंतरराष्ट्रीय परिषदेत भागिदारीसाठी प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले.