ब्राझीलमध्ये २०२२-२३ मध्ये ५६२ मिलियन टन ऊस गाळपाचा अंदाज : Datagro

साओ पाऊलो : डेटाग्रोने (Agribusiness consultancy Datagro) दिलेल्या माहितीनुसार ब्राझीलच्या मध्य-दक्षिण क्षेत्रामध्ये ऊस गाळप ५६२ मिलियन टनापर्यंत होईल अशी अपेक्षा आहे.

डेटाग्रोचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्लिनियो नास्तारी यांनी रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ऊस उत्पादनात पूर्वानुमानेपेक्षा आणखी घसरण होऊ शकते असा अंदाज आहे. कारण माटो ग्रोसो डो सुल, पराना आणि साओ पाउलो अशा राज्यांमध्ये अनियमित पावसाची स्थिती कायम आहे. डेटाग्रोने ९ मार्च रोजी एका कार्यक्रमात ब्राझीलमधील ऊस पिकासाठीचे अतिरिक्त पुर्वानुमान जारी केले जाण्याची अपेक्षा आहे.

नास्तारी यांनी सांगितले की, गेल्या काही आठवड्यात पाऊस न झाल्याने ऊस उत्पादनावर परिणाम होऊ शकते. आणि सध्याच्या पिकांचा हा महत्त्वपूर्ण विकासाचा टप्पा आहे. मातीमध्ये पाण्याचे भांडार आहे. मात्र, उत्पादनातील वाढीमुळे पाऊस पुन्हा येण्याची गरज आहे. ते म्हणाले की, पिकांचे नुकसान टाळण्यासाठी एप्रिल महिन्यात पावसाची गरज आहे. गेल्या हंगामात ब्राझीलमध्ये ऊसाचे पिक २०२०-२१ मधील ६०५.५ मिलियन टनाच्या पेक्षा खूप कमी असेल.

नास्तारी यांनी सांगितले की, देशातील साखर आणि इथेनॉल उत्पादन आताही रशिया आणि युक्रेन संघर्षावर अवलंबून आहे. कारण जैव इंधनाच्या किमती थेट कच्च्या तेलाशी संलग्न आहेत. तेलाच्या किमती गेल्या आठवडाभरात वाढल्या आहेत. अमेरिका आणि सहयोगी देशांकडून युक्रेनवरील आक्रमणानंतर रशियावर निर्बंध लागू केले आहेत. त्यानंतर कच्चे तेल ११० डॉलर प्रती बॅरलवर ट्रेड करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here