देशात सप्टेंबरमध्ये पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रण पोहोचले १५.९० टक्क्यांपर्यंत

नवी दिल्ली : पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण सप्टेंबरमध्ये १५.९० टक्क्यांवर पोहोचले. तर नोव्हेंबर २०२३ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत एकत्रित इथेनॉल मिश्रण १३.८० टक्क्यांवर पोहोचले आहे. एक ऑक्टोबर २०२४ पर्यंत, एकूण ८३,१९० पीएसयू किरकोळ दुकानांपैकी १६,७५६ पीएसयू आउटलेट्समधून ई २० इथेनॉल-मिश्रित एमएस वितरित केले जात आहे.

याबाबतच्या उपलब्ध अधिकृत आकडेवारीनुसार, सप्टेंबर २०२४ मध्ये ईबीपी कार्यक्रमांतर्गत पीएसयू ओएमसींकडून ५८६ कोटी लिटर इथेनॉल प्राप्त झाले. यामध्ये नोव्हेंबर २०२३ ते सप्टेंबर २०२४ पर्यंत एकूण इथेनॉल ५८५.२ कोटी लीटर होते. सप्टेंबर २०२४ मध्ये ईबीपी कार्यक्रमांतर्गत मिश्रित इथेनॉलचे प्रमाण ६२४ दशलक्ष लिटर होते, जे नोव्हेंबर २०२३ ते सप्टेंबर २०२४ पर्यंत एकूण ६०७४ दशलक्ष लिटरवर पोहोचले. सरकारने २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे लक्ष्य साध्य करण्याचा त्यांना विश्वास आहे.

अलीकडेच, इंधन विपणन कंपन्यांनी (ओएमसी) इथेनॉल पुरवठा वर्ष (ईएसवाय) २०२४-२५ साठी ९१६ कोटी लिटर इथेनॉलच्या पुरवठ्यासाठी निविदा मागवल्या आहेत. भारताची इथेनॉल उत्पादन क्षमता लक्षणीयरित्या वाढून ती आता १,६४८ कोटी लीटरवर पोहोचली आहे. ही वाढती क्षमता देशाच्या देशांतर्गत इथेनॉलची गरज भागवेल अशी सरकारला आशा आहे. तथापि, २० टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, सुमारे १,०१६ कोटी लिटर इथेनॉलची आवश्यकता असेल, जे इतर वापर लक्षात घेऊन एकूण १,३५० कोटी लिटर होईल. असा अंदाज आहे की जर प्लांट ८० टक्के कार्यक्षमतेने कार्यरत राहतील असे गृहीत धरले तर २०२५ पर्यंत इथेनॉल उत्पादन क्षमता सुमारे १,७०० कोटी लिटर आवश्यक असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here