नवी दिल्ली : भारतात सध्या इथेनॉल उत्पादनाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या काही वर्षात या उद्योगात मोठे बदल झाले आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने दिलेल्या एका नव्या माहितीनुसार २०१३-१४ या वर्षापासून इथेनॉल मिश्रण १.५३ टक्क्यांपासून वाढून इथेनॉल पुरवठा २०२०-२१ मध्ये ७.९३ टक्के झाला आहे.
पेट्रोलियम तथा नैसर्गिक गॅस राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. सरकारने इथेनॉल उत्पादनावर जोर दिल्यानंतर अनेक कंपन्यांनी या उद्योगात गुंतवणुकीस रुची दर्शवली आहे. अलिकडेचकाही शुगर कंपन्यांनी डिस्टिलरी स्थापन करण्याची घोषणाही केली आहे.
केंद्र सरकारने निश्चित केलेल्या उद्दीष्टानुसार, २०२५ पर्यंत पेट्रोलसोबत २० टक्के इथेनॉल मिश्रण केले जाणार आहे. त्यासाठी सरकारने विविध योजना जाहीर केल्या आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link