नवी दिल्ली : सरकारी मालकीच्या पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने (PFC) आसाम बायो-रिफायनरी प्रायव्हेट लिमिटेड (ABRPL) सोबत करार केला आहे. ज्या अंतर्गत नुमालीगडमध्ये बायो-रिफायनरी प्लांट उभारण्यासाठी ३,०३७.५० कोटी रुपयांचे कर्ज दिले जाईल. एका निवेदनात म्हटले आहे की, वार्षिक 3 दशलक्ष टन क्षमतेचा हा प्लांट बांबूचा कच्चा माल म्हणून वापर करेल.
४,२०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून २४ मेगावॅटच्या बायो-कोल-आधारित कॅप्टिव्ह पॉवर प्लांटसह २G बायोइथेनॉल आणि इतर उत्पादने जसे की फरफ्यूरिल अल्कोहोल, ॲसिटिक ॲसिड आणि लिक्विड CO२चे उत्पादन करण्यात येईल. ABRPL बांबू बायोमासपासून इथेनॉल तयार करणारी पहिली बायो-रिफायनरी आहे. नुमालीगढ रिफायनरी लिमिटेड आणि फिनलंडच्या फोर्टम आणि केम्पोलिस या दोन परदेशी कंपन्या या तीन प्रवर्तकांसह हा एक संयुक्त उपक्रम राबविण्यात येणार आहे.