नवी दिल्ली : भारतात पेट्रोलियम उत्पादनांची आयात कमी करणे हे माझे स्वप्न आहे असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. बोस्टन कन्सल्टींग ग्रुप द्वारे (बीसीजी) आयोजित एका कार्यक्रमात मंत्री गडकरी बोलत होते.
मंत्री गडकरी यांनी यावेळी वाहतूक व्यवस्थेच्या उद्देशासाठी इथेनॉलचा वापर व्हावा यासाठी प्रोत्साहन देण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. ते म्हणाले की, इथेनॉल हे आर्थिक रुपात स्वस्त, प्रदूषण मुक्त आणि स्वदेशी इंधन आहे. इथेनॉलमुळे देशातील कृषी विकासात वाढ होत आहे. कारण आम्ही तांदुळापासूनही इथेनॉलचे उत्पादन घेऊ शकतो, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केला.