इथेनॉल कंपनीत गुंतवणुकीच्या आमिषाने दाम्पत्याला २ कोटींचा गंडा

नाशिक : इथेनॉल कंपनीतील भागीदार रद्द करण्यास भाग पाडून संशयितांनी एका दाम्पत्याला तब्बल २ कोटी ११ लाखांना गंडा घातल्याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत, रेवती अश्वीन मोरे (रा कलानगर, म्हसरुळ) यांनी फिर्याद दिली आहे. संशयितांमध्ये एका बँकेच्या व्यवस्थापकाचाही समावेश आहे. दाम्पत्याने कंपनी खरेदीसाठी भागीदारी केल्यानंतर, त्यात आर्थिक गुंतवणूक केली. मात्र त्यानंतर फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सकाळमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, याप्रकरणी संशयित मुकेश राठोड, त्याची पत्नी, सौरभ राठोड, प्रणव राठोड, राहुल पवार, सीए रॉबिन, बँकेचे व्यवस्थापक गिरीश शेट्टी, हायड्रोस कुट्टी यांच्यावर म्हसरुळ पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित मुकेश राठोड याने ऑगस्ट २०१८ मध्ये आरसीलच्या इथेनॉल कंपनी खरेदीसाठी भागीदारी केली. मोरे दाम्पत्याने कंपनी सुरू करण्यासाठी मोरे यांची २ कोटीं ११ लाख २० हजार रुपयांची गुंतवणूक केली. नंतर संशयितांनी मोरे यांना भागीदारी रद्द करण्यासाठी भाग पाडले. त्यासाठी कॅन्सल धनादेशावर स्वाक्षरी घेतली. परंतु गुंतवणूक केलेली रक्कम परत केलेली नाही असे फिर्यादीत नमुद केले आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष ढवळे तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here