मनीला : आर्थिक विकासासोबत इथेनॉल आणि बायोडिझेलच्या मागणीत वाढ झाल्यामुळे फिलिपाईन्समध्ये जैव इंधनाचा खप यावर्षी वाढण्याची शक्यता अमेरिकेच्या कृषी विभागाने (USDA) व्यक्त केली आहे. याबाबत आपल्या विदेशी कृषी सेवेच्या (FAS) एका रिपोर्टमध्ये यूएसडीएने म्हटले आहे की या वर्षी इथेनॉलची मागणी १३ टक्क्यांनी वाढून ६६० मिलियन लिटर होण्याचे अनुमान आहे. बायोडिझेलची मागणी ३१ टक्क्यांनी वाढून २५० मिलियन लिटर होईल असे अनुमान आहे. फिलिपाईन्समध्ये कच्च्या मालाच्या समस्येमुळे या वर्षी इथेनॉल उत्पादन १.४ टक्के घसरून ३६० मिलियनपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. स्थानिक इथेनॉल उत्पादनात संभाव्य कमतरता आणि खपातील अपेक्षित वाढीमुळे यातील तफावत दूर करण्यासाठी फिलिपाईन्स इथेनॉल आयात ३३ टक्क्यांवरून ३०० मिलियन लिटरपर्यंत वाढवेल अशी शक्यता आहे.
उत्पादनाबाबत, यूएसडीएने म्हटले आहे की, बी ५ बायोडिझेल मिश्रणाची मागणी पूर्ण करण्यासाठी बायोडिझेल उत्पादन २५ टक्क्यांपर्यंत वाढू शकते. ऊर्जा विभागाने (डीओई) आपल्या वेबसाईटवर प्रकाशित केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, जैव इंधन रोडमॅपमध्ये सुधारणा केल्यानंतर सद्यस्थितीत दोन टक्के बायोडिझेलचे मिश्रण (बी ५) पासून पाच टक्क्यांपर्यंत वाढेल असे अनुमान आहे.