सोलापूर : चांदापुरी (ता. माळशिरस) येथील ओंकार साखर कारखान्याची गाळप २५०० मे. टनावरून ४००० मे. टनाने वाढवून ६५०० मे. टन करण्यात आली आहे. कारखान्यात इथेनॉल, डिस्टिलरीसह सहवीज निर्मिती होणार आहे. उपपदार्थ निर्मिती केली जाणार असल्याने ऊस दराबाबत शेतक-यांच्या आशा उंचावल्या आहेत. विस्तारीकरण या हंगामात पूर्ण होऊन हा विस्तारीत प्रकल्प गुरुवारी कार्यान्वित झाला. कारखान्याला नवीन प्रकल्पाच्या उत्पन्नातून वाढीव ऊस दर देणे शक्य होणार असल्याने शेतकऱ्यांनी या कारखान्याला जास्तीत जास्त ऊस घालण्याचे आवाहन प्रशांत बोत्रे-पाटील यांनी केले.
ओंकार कारखान्यात नवीन विस्तारित प्रकल्पाचा शुभारंभ गुरुवारी पहाटे संचालक प्रशांत बोत्रे-पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून कार्यान्वित करण्यात आला. चांदापुरी येथे गेल्या ४ वर्षांपूर्वी हा केवळ २५०० मे. टन गाळप क्षमतेचा कारखाना सुरू झाला. गाळप क्षमता कमी असून इतर उपपदार्थ निर्मिती केली जात नसताना या कारखान्याने आत्तापर्यंत शेतकऱ्यांना चांगला दर दिला आहे. या भागातून कारखान्याला शेतकरी वर्गातून वाढता प्रतिसाद मिळत गेल्याने गाळप क्षमता विस्तारीकरण करण्यात आले आहे, असेही सांगण्यात आले.
इथेनॉल इंडस्ट्रीच्या अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.