धनबाद : धनबादच्या इथेनॉलमुळे देशात धावणाऱ्या विद्युत वाहनांना गती मिळणार आहे. मंगळवारी इलेक्ट्रीफाईड फ्लेक्स इंधन वाहन लाँच करण्यात आले. ही देशातील अशी कार आहे जी इथेनॉल आणि इलेक्ट्रिक अशा दोन्ही प्रकारच्या इंधनावर धावते. इथेनॉल उत्पादनाचे संपूर्ण झारखंडमध्ये पाच कारखाने उभारले जाणार आहेत. यापैकी दोन धनबादमध्ये उभारले जातील.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, धनबादसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. पहिला कारखाना केजी स्पिरिट्स एलएलपी आणि दुसरा कारखाना अंकुर बायोकेम प्रायव्हेट लिमिटेडचा आहे. इतर तीन कारखाने जमशेदपूर, बोकारो आणि रामगड येथे उभारले जाणार आहेत. मक्का आणि खराब तांदळापासून इथेनॉल उत्पादन केले जाते.
इथेनॉल उत्पादन हा केंद्र सरकारच्या बहुआयामी प्रकल्पांपैकी एक आहे. हे इथेनॉल २० टक्के प्रमाणात पेट्रोलमध्ये मिसळले जाईल. त्यामुळे पेट्रोलच्या किमती तर कमी होतीलच. पण ते इलेक्ट्रीफाईड वाहनांसाठीही उपयुक्त ठरेल. त्यामुळे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात कमी होईल. इथेनॉल तयार करण्यासाठी ८० टक्के तुटलेला तांदूळ आणि २० टक्के मक्का वापरला जातो. कंपनीशी संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, इथेनॉल उत्पादनात कोणताही अपव्यय होत नाही. त्याच्या कचऱ्यापासून पशुखाद्य तयार केले जाते.