विजयवाडा : राजमुंदरी येथे इथेनॉल प्लांट स्थापन करण्यासाठी Assago Industries ला आवश्यक मंजूरी देण्याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन आंध्र प्रदेश इंडस्ट्रिअल इन्फ्रास्ट्रक्चर कॉरपोरेशनचे (APIIC) चेअरमन मेट्टू गोविंदा रेड्डी यांनी दिले आहे. Assagoने आधीच या प्लांटसाठी ३०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे.
दि न्यू इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, Assago च्या प्रतिनिधींनी शुक्रवारी APIIC च्या अध्यक्षांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी सांगितले की, सरकारला दीड वर्षात प्लांटची उभारणी करून आपल्या तातडीच्या योजनेबाबतचा अहवाल त्यांनी आधीच सादर केला आहे. या युनिटमधून जवळपास २०० लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. APIIC चे अध्यक्ष रेड्डी यांनी त्यांच्या निवेदनावर विचार केला जाईल आणि या प्रकरणात लवकरात लवकर निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.