काशीपूर : बाजपूर साखर कारखान्याचा तोटा कमी होण्यासाठी कारखान्यामध्ये इथेनॉल प्लांट सुरू करण्यात येणार असल्याची माहिती ऊस तथा साखर उद्योग विभागाच्या सचिवांनी दिला. यासाठी सर्व्हे करण्यात आला आहे. आणि काही सूचनाही करण्यात आल्या आहेत. १५ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील साखर कारखान्यांचे नवा गाळप हंगाम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीचे प्रयत्न सुरू असून साखर कारखान्यांचे अद्ययावतीकरण करण्यात आले आहे.
बुधवारी ऊस विभागाचे सचिव हरवंश चुघ यांनी ऊस तथा साखर आयुक्त कार्यालयास भेट दिली. त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर ऊस संशोधन केंद्रात विकसीत करण्यात आलेल्या नव्या प्रजातींची माहिती घेतली. त्यांनी सांगितले की, सितारगंज कारखाना निविदा काढून फेडरेशन चालविणारा आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर या हंगामात कारखाना सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सर व्यवस्थापकांची नियुक्ती करण्यात आली आहे. बाजपूर कारखान्यात इथेनॉल प्लांट स्थापन केला जाईल. त्यासाठीची तयारी सुरू असल्याचे चुघ म्हणाले. प्रत्येक कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील २०० प्रगतशील शेतकऱ्यांचा ऊस विभागाकडून गौरव करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी ऊस तथा साखर आयुक्त हंसा दत्त पांडे, उपायुक्त विवेक राय, जनसंपर्क अधिकारी नीलेश कुमार, आर. के. सेठ, सहायक साखर आयुक्त अर्जुन सिंह उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link