उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात इथेनॉल प्लांटची निर्मिती सुरू

गोंडा : उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात एक सुधारित, आधुनिक साखर कारखाना पाहायला मिळणार आहे. तेथे उसाच्या रसापासून थेट इथेनॉल उत्पादन केले जाणार आहे. जिल्ह्यातील कर्नलगंज सहसीलमधील मैजापूर येथे ४५० कोटी रुपये खर्चून बलरामपूर शुगर मिल्स लिमिटेडकडून या प्लांटची उभारणी केली जात आहे. येथे आधीपासूनच एक कारखाना सुरू आहे. त्याची ऊस गाळप क्षमता प्रती दिन ३००० टन इतकी आहे. तर नव्या प्लांटची उत्पादन क्षमता ४००० टीसीडी असेल. येथे ऊस गाळपास उपलब्ध न झाल्यास प्रतीदिन ८०० टन धान्य आणि ११००-१२०० टन मोलॅसिसवर प्रक्रिया केली जाऊ शकते. गोंडा आणि उत्तर प्रदेशातील उर्वरीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा कारखाना गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे.

मैजापूर येथील युनिट हेड संदीप अग्रवाल यांनी सांगितले की, आम्ही गळीत हंगामाच्या नोव्हेंबर ते एप्रिल या काळातील १५०-१६० दिवसांमध्ये उसाचा वापर करणार आहे. पुढील ५०-६० दिवसांत मोलॅसीस उपलब्ध होईल. ते कंपनीच्या इतर कारखान्यांमधून येईल. तर खराब तांदळाचा वापर उर्वरीत १४०-१५० दिवस केला जाणार आहे. हा प्लांट वर्षातील ३५० दिवस चालविण्याचे नियोजन आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here