माय शुगर कारखान्यात पुढील वर्षी इथेनॉल प्लांट स्थापन करणार : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

बेंगळुरू : पुढील वर्षी मंड्यामधील माय शुगर कारखान्यात एक इथेनॉल युनिट स्थापन केले जाईल आणि त्याला लाभ शेतकऱ्यांना मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले. मंड्या जिल्हा दुग्ध उत्पादक संघाच्या मेगा डेअरीच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, राज्यात दूध उत्पादन आणि डेअरी विकासाच्या माध्यमातून श्वेत क्रांती झाली आहे. कर्नाटकने दुग्ध क्रांतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. डेअरी क्षेत्रात तेजीने विकास करणाऱ्या या राज्यातील शेतकरी आणि महिलांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.

मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले की, बी. एस. येडियुराप्पा सरकारने प्रोत्साहन देण्याची सुरुवात केली होती आणि तेव्हा शेतकऱ्यांना ५ रुपये प्रती लिटर दिले जात होते. ते म्हणाले, शेतकऱ्यांचे जीवन जेव्हा अनिश्चित होते, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या जीवनात स्थैर्य आणण्यासाठी पुढे आले आणि त्यांनी सहकार मंत्रालय कृषी मंत्रालयापासून वेगळे केले आहे. आता सहकार मंत्रालय मजबूत बनले आहे. आणि त्यांनी क्रांतीसाठी पावले उचलली आहेत. या क्षेत्रात खूप सुधारणा आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बोम्मई यांनी सांगितले की, मंड्या हा एक कृषी क्षेत्रावर अवलंबून असलेला जिल्हा आहे आणि याला साखर आणि भातशेतीच्या क्षेत्रासाठी वापरले जाते. मात्र, येथे आताही सिंचन सुविधा आणि उद्योगांची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठई सरकारी क्षेत्रातील मायशुगर कारखाना सुरू करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here