कर्नाल : हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी कर्नाल साखर कारखान्यात १२० केएलपीडी (KLPD) इथेनॉल प्लांट स्थापन करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय साखर कारखान्यात लवकरच गूळ, कच्ची साखर उत्पादनाचा प्रोजेक्ट सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, प्लांट स्थापन केल्यानंतर कारखान्यात १२० केएलपीडी इथेनॉल उत्पादनाची क्षमता असेल. या निर्णयामुळे १३२ गावांतील सुमारे २६५० शेतकऱ्यांना मदत मिळेल. कारखान्याशी जोडल्या गेलेल्या या शेतकऱ्यांना इथेनॉल प्लांटमुळे अतिरिक्त उत्पन्न मिळेल आणि त्यांना वेळेवर ऊस बिले मिळू शकतील.
यावेळी त्यांनी कर्नाल साखर कारखाना गूळ तसेच कच्च्या साखरेचेही उत्पादन करेल अशी घोषणा केली. शेतकरी तसेच कामगारांसाठी एका कँटिनची स्थापना केली जाईल असे ते म्हणाले. अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन गळीत हंगाम सुरू करण्याबाबत त्यांनी निर्देश दिले.