कोल्हापूर, दि. 26: इथेनॉल वापराबाबत दोन-तीन दिवसात धोरण स्पष्ट केले जाणार आहे. केंद्र सरकार याबाबत सकारात्मक निर्णय घेत आहे.
इथेनॉल वापराचे धोरण आणि पुढील वर्षाचा साखरेच्या नियोजनाचा आराखडा तयार करण्याचे आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. यामुळे संकटग्रस्त साखर उद्योगाला दिलासा मिळणार आहे. सहकारी साखर कारखाना राष्ट्रीय महासंघ इंडियन शुगर मिल्स असोसिएशन यांच्या प्रतिनिधींबरोबर पंतप्रधानांचे प्रधान सचिव नृपेन मिश्र यांनी चर्चा केली.
साखर उद्योगाला संकटातून बाहेर काढण्यासाठी हा आदेश दिले आहेत. संकटातील साखर उद्योगाच्या उपाययोजनांवर तपशिलाने चर्चा केली आहे.
साखर उद्योगाला संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकार आणि व्यावसायिक पातळीवर प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
इथेनॉल वापराविषयी धोरणाची येत्या तीन-चार दिवसात घोषणा केली जाणार आहे. तसेच पुढील वर्षासाठी तपशीलवार कृती योजना तयार करण्याचे आदेश त्यांनी अन्न सचिवांना दिली आहे.