पुणे : केंद्र सरकारने सहकार मंत्रालय स्थापन केल्याचा फायदा राज्य सरकारला होणार आहे असे प्रतिपादन राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री यांनी केले. कोलमडण्याच्या मार्गावर असलेला राज्यातील साखर उद्योग, केंद्र सरकारच्या प्रोत्साहन आणि पॅकेजमुळे पुनरुज्जीवीत झाला आहे असेही ते म्हणाले.
माजी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, केंद्र सरकारने आता इथेनॉल पॉलिसीची घोषणा केली आहे. त्याचा लाभ राज्यातील साखर उद्योगाला होणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सहकार मंत्रालयाचे नेतृत्व करणार आहेत. याविषयी विचारले असताना फणवीस म्हणाले, राजकारणात येणाऱ्यापूर्वी अमित शहा हे सहकार क्षेत्रात कार्यरत होते. ते गुजरातमधील सहकारी क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये होते असे फडणवीस यांनी सांगितले. जर शहा यांनी सहकार मंत्रालय सांभाळल्यामुळे कोणाला चिंता वाटत असेल तर त्याला आम्ही काही करू शकत नाही असा टोलाही फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link