बँकॉक : जगभरात वातावरणास अनुकूल इंधनाच्या वापरावर भर दिला जात आहे. यामध्ये इथेनॉलला प्राधान्य दिले जाते. अनेक देशांत इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांवर भर दिला जात आहे. यामध्ये भारतासह थायलंडचे नावही सहभागी आहे.
प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, होंडा क्लिक १६० या नावने नवी स्कूटर थायलंडच्या बाजारात लाँच केली जात आहे. ही इथेनॉलवर चालणारी स्कूटर आहे. ही स्कूटर २० टक्के इथेनॉल मिश्रीत इंधनावरही चालू शकते.
स्कूटरचे नाव भारतात विक्री केल्या जाणाऱ्या क्लिकशी साधर्म्य असलेले आहे. भारतात या स्कूटरच्या लाँचबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. होंडा क्लिक १६० आशियाई बाजाराच्या अनुरुप विकसित करण्यात आली आहे. भारतातही फ्लेक्स-फ्यूएल वाहनेही बाजारात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पेट्रोलचा खर्च बायो इथेनॉलच्या तुलनेत कमी आहे. इथेनॉल वापराने प्रदूषणही कमी होते.