इथेनॉल दर वाढीचा निर्णय चांगला की वाईट?

नवी दिल्ली चीनी मंडी

केंद्र सरकारने आगामी २०१८-१९च्या हंगामात इथेनॉलच्या खरेदी दरात २५ टक्क्यांनी वाढ करून साखर उद्योगाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. पण, या निर्णयानंतरही साखर उद्योगाला चिंता सतावत आहे. केंद्राने ज्या पद्धतीने निर्णय जाहीर केला. त्यातून केंद्राला इथेनॉलचे उत्पादन वाढवायचे आहे आणि त्यावरची गुंतवणूकही वाढवायची आहे. पण, यामुळे साखर कारखान्यांच्या आजवरच्या ढाच्यालाच तडे जाण्याचा धोका असल्याचे बोलले जात आहे.

सध्याच्या घडीला शेतकऱ्यांना साखरेचे दर घसरले तरी, उसाचा दर वाढवून हवा आहे. सरकार किमान आधारभूत किमतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सावरण्याचा प्रयत्न करत आहे. मुळात कारखाने नुकसानीत जात असतील, तर ते शेतकऱ्यांचे पैसे भागवत नाहीत. सरकार एका बाजूला कारखान्यांना त्यांची देणी भागवण्यास सांगत आहे. पण, दुसरीकडे साखरेचे दरही वाढवत नाही. कारण, साखरेचा देशातील सामान्य ग्राहक हा त्यांचा आगामी निवडणुकीतील मतदार आहे.

सध्याच्या हंगामात साखरेचे चांगले उत्पादन झाले असून, आगामी हंगामातही उच्चांकी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. परिणामी साखरेच्या उठावा अभावी शेतकऱ्यांची थकबाकी भागवणे कारखान्यांना अवघड होणार आहे.

या सगळ्यावर उसाला साखरेऐवजी इथेनॉल निर्मितीकडे वळवणं, हा एक पर्याय होता. यात सरकारने साखर उद्योगाला इथेनॉल निर्मितीमध्ये गुंतवणूक करण्याचे सूचित केले आहे. तेल कंपन्या त्याचे पैसे देतील, असे आश्वासित केले आहे.

उसाचा रस थेट इथेनॉल तयार करण्यासाठी वापरण्याच्या योजनेत सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. यात सी ग्रेड मळीपासून तयार होणार इथेनॉल ४३.७० रुपये प्रति लिटरच ठेवण्यात आले आहे आणि थेट रसापासून तयार केलेल्या इथेनॉलच्या खरेदीत २५ टक्क्यांची वाढ केली आहे. त्याचबरोबर बी ग्रेड मळीपासूनच्या इथेनॉलमध्ये केवळ ११.३ टक्क्यांची वाढ केली आहे. या इथेनॉलचा दर ५२.४० रुपये असेल.

सी ग्रेड मळीची तुलना केली, तर साखरेचे उत्पादन २० टक्क्यांनी कमी होऊन इथेनॉल दुप्पट होते. तर थेट उसाच्या रसापासून इथेनॉल केले तर, त्याला २५ टक्के वाढीने ५९.१० रुपये प्रति लिटर दर मिळतो.

सरकारच्या म्हणण्यानुसार थेट उसाच्या रसापासून इथेनॉल केले, तर उत्पादन सहापट वाढेल आणि साखरेचे उत्पादन शून्य होईल. शंभर टक्के उसाच्या रसापासून इथेनॉल तयार करण्यात केवळ इथेनॉल तयार होणार असल्याने त्याच्या किमतीत तुलनेने सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे साखर कारखाने केवळ इथेनॉल उत्पादन करून लगतील, अशी अपेक्षा आहे. पण, कारखाने त्याच्या खरेच त्यांच्या डिस्टलरी क्षमतेत वाढ करण्यासाठी गुंतवणूक करतीलत्याचबरोबर प्रदूषण नियंत्रण मंडळाची त्यांना अनुमती लागेल. त्याचबरोबर कारखान्याकडे साठवणूक क्षमता ही असायला हवी, असे मत बलरामपूर साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून व्यक्त करण्यात आले आहे. या कंपनीकडून डिस्टलरीसाठी नव्याने २०७ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येत आहे.

सरकारचा एखाद्या उद्योगाला उभारी देण्याचा प्रयत्न चुकीचा मुळीच नाही. त्याचबरोबर इथेनॉल मिश्रणामुळे तेलाच्या आयतीवर नियंत्रण आणता येईल. अर्थात सरकारने हा प्रॉब्लेम ओढवून घेतला आहे. जर सरकारने उसाची किंमतच जर कमी जास्त होईल, अशी व्यवस्था केली, मार्केटमधूनच त्याच्यावर योग्य नियंत्रण राहील. इथेनॉलला प्रोत्साहन देणे हा पर्याय राहणार नाही.

जेव्हा कच्च्या तेलाचे दर कमी होतील, तेव्हा तेल कंपन्यांना कमी इथेनॉलची गरज लागेल. तेलाच्या घसरत्या किंमती हे ब्राझीलधील इथेनॉल निर्मितीला धक्का बसण्यामागचे कारण होते. तसेच जर इथेनॉलच्या किमती घसरल्या, तर साखर कारखान्यांचे मार्जिन कमी होईल कारण, उसाचे खरेदी दर निश्चित असतात आणि जर तेल कंपन्यांना आहे त्या दराने इथेनॉल खरेदी करण्याची सक्ती केली, कंपन्या अडचणीत येतील. त्याचबरोबर हवामानातील बदल. त्यातून ऊस पिकाला होणारे संभाव्य नुकसान याचही विचार करायला हवा. मुळात जर, साखरेचे उत्पादनच कमी झाले आणि बाजारात दर वाढले तर सरकार काय करणारजर, कारखान्यांनी खरचं १०० टक्के उसाचा रस इथेनॉल निर्मितीला दिला, तर निश्चितच साखरेच्या पुरवठ्यावर परिणाम होईल आणि कारखान्यांना देखील हेच हवे आहे.

सरकारला मात्र, अशी परिस्थिती चालणार नाही. आताही साखरेच्या किमती खाली ठेवण्यासाठी कारखान्यांना किमान साखर विक्रीसाठी बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. जर, दर घसरले, तर सरकार तातडीने कारखान्यांना साखर उत्पादन वाढविण्याच्या सूचना देईल. किंवा इथेनॉलच्या खरेदी दरात कपात केली जाईल. हा विषय जर तरचा वाटत असला, तरी साखर उद्योगाचा आढावा घेतला, तर हे निश्चितच पटणारे आहे.

या सगळ्या विषयावर कायमस्वरूपी आणि चांगला तोडगा काढायचा असेल, तर प्रत्येक साखर कारखान्याचे साखर उत्पादन, इथेनॉल उत्पादन आणि वीज निर्मिती यातून येणाऱ्या पैशांवर उसाचा दर ठरवला जावा, हा उत्तम पर्याय ठरू शकतो. की, आपल्या सरकारमध्ये आणखी एखादा चुकीचा निर्णय चांगला असल्याचे दाखविण्याची क्षमता आहे, हे येणारा काळच ठरवेल.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here